जामखेड :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल नाईकवडे यांच्याकडे दाखल केला.
यावेळी प्रकाश महाराज जंजिरे, प्रतापराव खराडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पवार यांची आई सुनंदा, पत्नी कुंती, बहीण सई, चुलते रणजित व चुलती शुभांगी उपस्थित होते.

उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात रोहित पवार यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम संपत्तीची माहिती दिली आहे.
मूळचे बारामतीचे असलेले व नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार व त्यांच्या पत्नीकडे एकत्रित ५४ कोटीची संपत्ती आहे.
त्यात दोघांकडे २५ कोटीची जंगम मालमत्ता आहे. दोघांकडे मिळून तब्बल ३ किलो १०० ग्रॅम सोने आहे. रोहित पवार हे महागड्या घड्याळाचे शौकिन असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांची २८ लाखाची ५ घड्याळे आहेत. पत्नीकडेही ७ लाखांचे एक घड्याळ आहे.
रोहित पवार यांची संपत्ती
- रोख रक्कम – 3 लाख 76 हजार रुपये
- बँक खात्यात – 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये
- शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक – 9 कोटी 65 लाख रुपये
- सोनं – 11 लाख 21 हजार (पत्नी आणि कुटुंबाकडे 67 लाखांचं सोनं)
- चांदी – 47 हजार रुपये किंमत
- हिरो – 1 लाख 68 हजार रुपये किंमत
- इतर दागिने – 4 लाख 52 हजार
- महागडी घड्याळ – 28 लाख रुपये
- घर, फ्लॅट, शेतजमीन – 5 कोटी रुपये (सध्याच्या बाजारभावानुसार 24 कोटी रुपये किंमत)
- दुचाकी – 12 लाख रुपये
- वडिलोपार्जित मालमत्ता – 3 कोटी 46 लाख रुपये
- बँकेचं कर्ज – 3 कोटी 74 लाख रुपये
- एकूण संपत्ती – 18 कोटी 40 लाख 45 हजार रुपये (पत्नीकडे 7 कोटी 28 लाख 18 हजार रुपयांची संपत्ती)
- अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, श्रीरामपूरच्या ‘या’ सुप्रसिद्ध चित्रपट गीतकाराची कविता अभ्यासक्रमात
- अखेर ‘सिस्पे कंपनी’च्या संचालक मंडळावर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; जादा परताव्याच्या आमिषाने ४५० कोटींची फसवणूक
- अहिल्यानगरजवळ ‘या’ एमआयडीसीत सुरू होता पैसे छापायचा कारखाना, ५९ लाखांच्या बनावट नोटांसह अडीच कोटी नोटांचे साहित्य जप्त
- शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार Vivo V60; 3 कलर ऑप्शन, 6500 mAh बॅटरी अन बरच काही….