कब्रस्तानच्या खोलीत आढळला तरुणाचा गळफास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-राहूरी तालुक्यातील टाकळीमिया येथे असलेल्या कब्रस्तानमधील सामान ठेवण्याच्या खोलीत काल अश्पाक पठाण, (वय२० स. टाकळीमिया) या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

या घटनेने टाकळीमिया परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी ‘घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अश्पाक पठाण आईसह ‘टाकळीमिया परिसरात राहतो. तो घरी न आल्याने आईने त्याची चोकशी सुरू केली, तेव्हा मटण दुकान चालकाने तो कब्रस्तानच्या खोलीत बसत असतो

याची माहिती असल्याने तेथे जावून पाहिले असता अश्याक पठाण हा गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला. त्याने आत्महत्या का केली? कधी केली? का आणखी काही प्रकार आहे? याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment