नगर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी आयटी पार्कमधील युवक-युवती तसेच आई-वडिलांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
वडील तथा आमदार अरुण जगताप, आई पार्वतीबाई जगताप तसेच आयटीपार्कमध्ये नव्याने कार्यरत झालेले दर्शन गाडळकर, आकांक्षा भिंगारदिवे, फराह इनामदार, शुभम जोशी, अक्षय बांगर, साहिल सचदेव, सौरभ पवार, अजिंक्य आढाव, देवेंद्र वैद्य हे युवक-युवती जगताप यांच्या समवेत होते. अर्ज दाखल केल्यानंतर जगताप म्हणाले, गेल्या पाच वर्षात नगर शहरात विविध रस्त्यांची कामे केली.
शहराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला.आयटी पार्कच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देवू शकलो. फक्त जुमलेबाजी न करता काम करुन दाखवलंय त्यामुळे नगरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
- Adani Green Energy Share : अदानी ग्रुपसोबत मोठा धोका ! शेअरमध्ये मोठी घसरण
- Vodafone Idea ने केला मोठा बदल, ट्रायच्या आदेशामुळे नवीन प्लॅन सादर
- Gold Price Today : इतिहास रचला! सोन्याच्या किंमतींनी तोडले जुने सारे विक्रम!
- RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप D’ पदाच्या तब्बल 32,438 जागांसाठी मेगाभरती सुरू: दहावी आणि आयटीआय उत्तीर्णांना सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा
- EPFO नियमांमध्ये मोठा बदल ! 4 लाख प्रलंबित प्रकरणे सोडवणार …