अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्रातील मोदी सरकारने आज कोरोनाव्हायरस लस मोफत देण्याची मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्यावतीने असे सांगण्यात आले की, कोरोना व्हायरस लस संपूर्ण देशात विनामूल्य देण्यात दिली जाईल.
देशभरात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात झाली आहे. यानिमित्त तीन राज्य वगळता सर्व राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरात लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येत आहे.

यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी हॉस्पीटल इथल्या लसीकरण केंद्रावर जाऊन ड्राय रनची पाहणी केली. संपूर्ण देशामध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन सुरू झाली आहे.
कोरोना लसीकरणाची ड्राय रन प्रत्येक राज्याच्या राजधानीत होत आहे. कोरोनाव्हायरस लस राज्यांच्या शेवटच्या भागापर्यंत नेणे हे उद्दीष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रात 25 जणांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशात मोफत कोरोनाची लस देणार असल्याचे जाहीर केले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved