नगर शहरातून शिवसेना-भाजपा युतीची उमेदवारी माजी आमदार अनिल राठोड यांना पुन्हा मिळाली आहे. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली.
भाजप व सेना एकत्रित लढत असल्यामुळे आता सर्वांचीची मोट सेनेला बांधावी लागणार आहे. मागील काही काळात राठोड व गांधी यांच्यात सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता ही मनधरणी सुरु झाली आहे. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा गांधींवर आगपाखड करणारे राठोड समर्थक गांधी यांच्या घरी जावून आले आहेत. पण अद्याप त्यात यश आले नसल्याचे समजते.

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान दिलीप गांधी यांच्या नावाला राठोड यांनी जाहीर विरोध दर्शविला होता.त्यामुळे गांधी व राठोड यांच्यातील वाद आणखीच चिघळला. गांधी यांनीही राठोड सेनेचे उमेदवार असतील तर आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा दिला होता.मागील आठवड्यात राठोड यांनी आले तर त्यांच्यासह व न आल्यास त्यांच्याशिवाय असे सूतोवाच पत्रकार परिषदेत केले होते. मात्र आता राठोड यांना उमेदवारी मिळार्लयाने त्यांच्या समर्थकांनी गांधी यांची मनधरणी सुरु केली आहे.
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना
- नेवासा तालुक्याती मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक
- शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते