अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- शहरातून मोटारसायकल चोरी करणार्या एकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देवीदास नल्ला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध तोफखाना पोलीस घेत असताना, शहरातील सोळातोटी कारंजा परिसरात तेथे एक जण विना नंबरच्या मोटारसायकलवरून संशयितरित्या फिरताना दिसला.
पोलिसांनी त्याला थांबून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. नगर शहरातून अनेक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असून पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
आरोपी नल्ला याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved