डॉ.संकेत पुरोहित यांचा रुग्णांकडून उस्फुर्त सन्मान.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- सामान्य गरीब रुग्णांना अल्प दरात सेवा देण्याची आचार्य श्री आनंदऋषजी यांनी संकल्पना मांडली. आदर्शऋषी आणि सहकार्‍यांनी ती प्रत्यक्षात आणली.

संतोष बोथरा व सर्व सहकारी मित्रांनी ती पूर्णत्वास नेली. मात्र डॉ. आशिष भंडारी, डॉ. गोविंद कासट आणि सेवाभावी डॉक्टरांनी निस्पृह सेवेचा कळस चढवून आनंदऋषी डायलिसिस विभाग आज देशात अग्रेसर केलाय.

केवळ सुसज्ज आधुनिक सामुग्री नव्हे तर प्रत्येक कर्मचारी हा अदबशिर सेवाभावी हे येथील वैशिष्ट्ये असून डॉ. संकेत पुरोहित यांना मिळालेला ‘किडनी वॉरियर्स योद्धा’ हा देश पातळीवरील पुरस्कार हे त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन नवनीत विचार मंच आणि नगर पर्यटन महोत्सवचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले.

संकेत पुरोहित यांचा गौरव म्हणजे संपूर्ण हॉस्पिटलचा सन्मान असल्याच्या शब्दात सुधीर मेहता यांनी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या निरपेक्ष रुग्ण सेवेचा गौरव केला. डॉ. आशिष भंडारी, किडनी विकार तज्ञ डॉक्टर गोविंद कासट, प्रकाश मुनोत, दिपक धेंड, डॉ. यशोदीपा कांकरिया,परमजीत सभरवाल, रवि बोरसे, आदित्य पावसे, सतीश संचेती,प्रकाश गडे, रमेश सावंत, पेशंट आणि पालक तर तंत्रज्ञ कर्मचारी बाळासाहेब लहरे,

बाळू दळवी, तुषार गाडेकर, प्रवीण बोर्डे, छाया गादे, प्रज्ञा कुलकर्णी आदींनी यावेळी संकेत पुरोहित यांचा सन्मान केला नेहमी इतरत्र रुग्ण आणि पेशंट यांचा वेगळाच सामना रंगतो पण आनंद ऋषितल्या या आगळ्या सन्मानाने सगळ्यांनाच सुखावून गेला.. आनंद दर्शन डायलिसिस क्लब..

डायलिसिस रुग्णांसाठी आनंद दर्शन डायलिसिस क्लब सुरू करणार असून किडनी रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन त्यांच्या जागृती आणि प्रसंगी आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा मेहता यांनी केली.डॉ. आशिष भंडारी यांनी या क्लबला संपूर्ण मार्गदर्शनाचे आश्‍वासन दिले.डॉ. गोविंद कासट यानी लवकरच किडनी रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू होत असून त्याचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले .

जगभरातील किडनी वरियार योध्यांसाठी देण्यात येणारा पुरस्कार महाराष्ट्रातील रोज दोन हजार डायलिसिस आणि सर्व उच्च वैद्यकीय सेवा देणार्‍या आनंदऋषी डायलिसिस विभागाचे मुख्य तंत्रज्ञ संकेत पुरोहित यांना दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन देण्यात आला.

यावेळी परमजीत सभरवाल यांनी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेचा पुरस्कार आनंदऋषी हॉस्पिटलला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment