अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-कोरोना रोगाने जगभरात थैमान घातले. त्याची लस येत नाही तोच दुसऱ्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. कोरोनाचं संकट असताना राजस्थानमध्ये आणखी एका संकटानं डोक वर काढल आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आता झोप उडाली आहे.
कावळ्यांच्या मृत्यूने जनसामान्य लोकांमध्ये पण घबराट पसरली आहे. राजस्थानातील हाडोती भागात तर १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय.
राजस्थान सरकार आता अलर्ट झालं असून राज्याचे पशूसंवर्धन मंत्री लालचंद कटारिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
संपूर्ण घटनेवर आमचं पूर्णपणे लक्ष असून यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं कटारिया म्हणाले. कावळ्यांच्या मृत्यूने केला कहर राजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.
यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं आहे.
आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
सदर रोगाची माणसाला लागण होते का नाही याची अजून माहिती मिळालेली नाही.माणसाला लागण होण्याचा धोका पशु चिकित्सकांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
एका पक्ष्यातून दुसऱ्या पक्ष्याला जर या फ्लूची लागण होत आहे. तर मनुष्यप्राण्यालाही याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved