अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाच्या जेवणातून विषबाधा; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-अन्नातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी आपण ऐकल्या असतील. मात्र चक्क लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.

यामुळे लग्नास उपस्थित राहिलेल्या पाहुणेमंडळींना हे लग्न जरा भारीच पडले आहे. दरम्यान विषबाधा झालेल्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे कडस्कर व काळे यांचा शुभविवाह होता यामधे विवाह लागल्यानंतर जेवण करत असतांना अचानक अनेकांना उलटी ,

मळमळ,चक्कर येवुन अनेक जण जमिनीवर कोसळले. या सर्व बाधित रुग्णांना राहुरी कारखाना येथिल नर्सिग होम, प्रवरा हाॅस्पिटल लोणी, राहुरी ग्रामिण रुग्णालय,राहुरीतील लहान मुलांचे डाॅ,प्रकाश पवार,

डाॅ नेहे,डाॅ वने,डाॅ म्हस्के तसेच डाॅ संदिप कुसळकर आदी डाॅक्टरांनी बाधित रुग्णावर उपचार केले. दरम्यान या लग्न समारंभात तब्बल 200 ते300 जणांना विषबाधा झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment