मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पिता-पुत्राला अटक केली. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत.
पीएमसी बँकेचे कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण ४४ मोठ्या खात्यांपैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित १० खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवान यांचे, तर दुसरे राकेश वाधवान यांचे खासगी खाते आहे. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते.

मात्र तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या जवळपास ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
- कोपरगाव तालुक्यात आगामी निवडणुकीत काळे-कोल्हे सत्तासंघर्ष तीव्र होणार, शिवसेना ठरणार गेमचेंजर?
- सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ! 7 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- साईभक्तांसाठी बांधण्यात आलेल्या ‘त्या’ दोन इमारतीसंदर्भात साई संस्थानचा पाठपुरावा सुरू, विखेंची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार
- साईभक्तांसाठी महत्वाची बातमी! गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीतील ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती ठेवण्यात येणार बंद
- अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ