अहमदनगर ब्रेकिंग : पतसंस्थेच्या शाखाप्रमुखाचा कार अपघातात मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- पारनेर सेनापती बापट पतसंस्थेच्या पाडळी दर्या शाखा प्रमुखाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर रोहिदास जगदाळे (वय- २७ वर्षे, रा. बाभुळवाडे ता.पारनेर) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. 

काल (शनिवार दि.२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वडझिरे सबस्टेशनजवळील वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ब्रीजा कार झाडावर जावून आदळली. या भिषण अपघातात गंभीर जखमी ज्ञानेश्वर याचा दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता.

मृत ज्ञानेश्वर जगदाळे हा सेनापती बापट पतसंस्थेत पाडळी येथे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होता. शनिवार दुपारी मित्राची कार घेवून पारनेर येथे कामानिमित्त जाताना वडझिरे येथिल वीजवितरण उपकेंद्राजवळील वळणावर कारवरील संतूलन बिघडल्याने कार झाडावर जावून आदळली.

यात कारचा अतिवेग असल्याने एयरबँग उघडूनही ज्ञानेश्वर गंभिररित्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी त्याला तातडीने पारनेर रूग्णालयात दाखल केले. मात्र गंभिर जखमी असल्याने त्याला इतरत्र हलविण्यास सांगितले. शिरूर जि.पुणे येथे नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.

शिक्रापूर येथिल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनानंतर आज रविवारी त्याच्यावर बाभुळवाडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या निधनाने बाभुळवाडे गावावर शोककळा पसरली.

त्याच्या निधनाबद्दल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पारनेर भाजपचे माजी अध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांच्यासह त्याच्या मित्रपरिवाराने शोक व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment