शिक्षण दिनानिमित्त फिरोदिया प्रशालेत ई-वाचनालयाचा प्रारंभ- मुख्याध्यापक श्री.विजय कदम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-  सावित्री बाई फुले यांनी मुलींसाठी ज्ञानाची दारे खुले केले आणि मुलींना शिक्षण सुरु करण्यासठी अथक प्रयत्न घेतले.

शिक्षणाची महत्वाकांक्षा मुलींमध्ये रुजविण्याचे महान कार्य सावित्री बाई फुले यांनी केले आणि त्यांचे कार्य हे समाज परिवर्तनाचे आहे, असे मत श्री.कदम यांनी व्यक्त केले.

तसेच ०३ जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षण दिन म्हणून प्रशालेत साजरा करण्यात आला . या प्रसंगी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ज्ञानात भर पडावी, शिक्षणाबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीम.छायाताई फिरोदिया,

अ.ए. सोसायटी विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनातून प्रशालेत ई-वाचनालयची सुरुवात करण्यात आली . त्याद्वारे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्याना विविध गोष्टींच्या पुस्तकातून ज्ञान मिळविण्यासाठी सुलभता निर्माण होणार आहे.तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रशालेत नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात.

या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजय कदम,पूर्व प्राथमिक वर्गाच्या इनचार्ज सौ.मिनाक्षी सोनवणे यांनी सर्व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन विशाल तांदळे , प्रसाद शिंदे, पराग विलायते, शरद कातोरे तसेच सर्व शिक्षक, पूर्व प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका , सेवकवृंद यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment