अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- बाजारातील साखरेचे भाव घसरते असल्याने ऊस उत्पादकांना योग्य मोबदला देता येत नाही, यंदाही साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे भाव कोसळण्याची भीती व्यक्त करून आगामी वर्षातही हीच परिस्थिती राहणार असल्याच्या शक्यतेने
केंद्र शासनाने साखर कारखान्याकरिता विशेष पॅकेज घोषित करावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा केदारेश्वर कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे यांनी केली.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात उत्पादित केलेल्या ‘एक लाख एक’व्या साखर पोते पूजन समारंभात माजी मंत्री ढाकणे बोलत होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, लोकमंगल कारखान्याचे संस्थापक संचालक अविनाश महागावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता सी. डी. फकीर, ऊस शास्त्रज्ञ सुभाष जमधाडे, बाळकृष्ण गिते, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट,
जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, व्यंकटेश मल्टीस्टेचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे, सुरेश होळकर, राजेंद्र दौंड, सतीश गव्हाणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. ऋषिकेश ढाकणे यांनी आभार मानले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved