संजय निरुपम काँग्रेस सोडणार ?

Ahmednagarlive24
Published:

मुंबई: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी आता पक्षाला गरज उरलेली नसल्याचे सांगताना या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पक्षाला रामराम करायची वेळ अद्याप आलेली नाही, असे मला वाटते आहे.

पण पक्षातील नेते ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता आता तो दिवसही फारसा दूर नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतून विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी केवळ एकाच नावाची मी शिफारस केली होती. मात्र त्या नावाबाबतही पक्षनेतृत्वाने विचार केलेला नाही.

पक्षनेतृत्वाला आपण याबाबत आधीच सांगितले होते की, जर माझे म्हणणे विचारात घेतले गेले नाही तर मी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आता मी पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment