दहा ग्रामपंचायतीना मिळणार 30 लाख !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या,

तर राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगाव या पाच ग्रामपंचायती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या.

त्यामुळे तालुक्‍यातील एकूण दहा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. जामखेड तालुक्‍यातील बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला 30 लाखांचा निधी मिळवून देऊ,

असे आमदार रोहित पवार यांनी मागील आठवड्यात जाहीर केले होते. आणि पवारांच्या आवाहनाला तालुक्‍यातील दहा ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe