जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; बळीराजा चिंताग्रस्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, या संकटातून बळीराजा सावरतो तोच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका गहू व कांद्याच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

थंडीची लाट कमी झाली असतानाच सोमवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

नगर शहरातही रात्री नऊनंतर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम गहू व कांद्याच्या पिकावर होणार आहे.

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर कांद्याचे क्षेत्रदेखील वाढले आहे. गेल्या महिन्यात गव्हासाठी पोषक असलेली थंडी आता अवकाळी पावसामुळे घातक ठरण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!