‘या’ तालुक्यामध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

काल अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजला मात्र बिनविरोधची घोषणा केवळ पोकळ ठरली.

यातच शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीत ४४० उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असून या निवडणुकीत एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही.

मात्र काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पाथर्डी तालुक्यातील तिनखडी, खेर्डे, सोमठाणे खुर्द या तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ४८ ग्रामपंचायतीच्या १ हजार २९५ उमेदवारा पैकी ४४० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणुकीतील ग्रामपंचायतच्या काही सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून रात्री उशिरापर्यंत अर्ज तपासणी सुरु असल्याने नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीच्या किती जागा बिनविरोध झाल्या याची माहिती समजू शकली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment