कोपरगाव : कोपरगाव विधानसभेसाठी महायुतीच्या भाजप उमेदवार म्हणून आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव घोषित केल्यानंतर काल गुरुवारी (दि. ३) ११.३० वाजता आ. कोल्हे यांनी कलश लॉन्स ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीच्या रॅलीतील भगव्या झंझावाताने विरोधकांचे अवसान गळाले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याबरोबर माजीमंत्री शंकरराव कोल्हे, दत्तू नाना कोल्हे, नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, विवेक कोल्हे, ईशान कोल्हे, रोहिणी कोल्हे सर्व कोल्हे कुटुंबीय यावेळी हजर होते.

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव शहर आणि मतदार संघाला न्याय देवून येथील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण जीवाचं रान करू, सिंचनयुक्त शेती आणि टँकरमुक्त मतदार संघ घडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आंबेडकर मैदानावरील कार्यकर्ता मेळाव्यात दिली.
कोपरगाव शहर विकासासाठी कोट्यवधीचा निधी गेल्या पाच वर्षात आणूनही नगराध्यक्षांनी त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून सतत भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आपल्याला टीकेचे लक्ष करून मतदारांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वांनी आता सावध व्हावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
- 25 वर्षे पाण्याचा प्रश्न मिटणार ! शिवधनुष्य उचललं सुजय विखेंनी, आता गाव पाण्याच्या संकटातून मुक्त होणार
- खासदार नीलेश लंके यांंच्या उपोषणास सुरूवात ! नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय माघार घेणार नाही…
- नेवासा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरावरील ऊस जळून खाक, आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान
- राहुरी तालुक्यात मोटारसायकलवरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले, दोघांवर गुन्हा दाखल
- कर्जत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सन्मान