राहुरी : मनमाड-नगर रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोरून पुढे जाताना ट्रक (क्र. एमएच ११ एम ५७५९) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अविचाराने हयगयीने रस्त्याच्या उजव्या लेनवरून अचानक कोणतीही इंडिकेटर न देता व पाठीमागील वाहन न पाहता अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला लेनवर घेऊन एकदम ब्रेक मारला.
त्याच्यावेळी पाठीमागून येणाऱ्याने हुंदाई कार (क्र. एमएच १४ सीसी ४१३८)ने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात कारचालक सुजित जयसिंग मगर (वय ३२, रा. मठवस्ती, पळवे सुपा एमआयडीसी, ता.पारनेर) हेा गंभीर जखमी झाले. औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी अति जयसिंग मगर (वय २९, रा. फोर्जिंग कॉलनी, वडगाव गुप्ता, एमआयडीसी अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक राजेंद्र हरी वामन (रा.कोकणगाव, ता.संगमनेर) याच्याविरूद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सापांची भीती वाटते ? मग घरात ही वस्तू अवश्य ठेवा, साप दिसला की शिंपडा, 100% साप पळून जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुम्हालाही योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु
- लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार ! 12,500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार 40,00,000 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत आजच गुंतवणूक करा
- Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दर महिन्याला मिळणार फिक्स व्याज