श्रीगोंदा : जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टीक टीक बंद करू. विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार असून, श्रीगोंदे मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार हा तोडपाणी करणारा असल्याची घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. श्रीगोंद्यातून काल बबनराव पाचपुते यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांतर झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात खा.डॉ.विखे बालत होते.
या मेळाव्यास पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक विठ्ठल चाटे, भगवानराव पाचपुते, दादासाहेब जगताप, सदाशिव पाचपुते, दत्तात्रय पानसरे, संतोष लगड, बाळासाहेब महाडिक, भाऊसाहेब गोरे, सुभाष डांगे, संतोष खेतमाळीस,छाया गोरे, सुनीता शिंदे,अशोक खेंडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की राज्यातला विधानसभा निवडणुकीच्या निकाल अणि श्रीगोंदे मतदार संघाचा निकाल सांगण्यासाठी भविष्यकाराकडे जाण्याची गरज नाही.

श्रीगोंदे मतदार संघात पुढचा उमेदवार फुसका निघाला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून कुकडीच्या प्रकल्प अहवालात असलेले पाणी खाली आणू. कायद्यानुसार पाणी मिळाले नाही तर पुणेकरांना बेड्या ठोकुन पाणी आणणार असे शिंदे म्हणाले. यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले की, आम्ही ५ वर्षांपूर्वी निर्णय घेतला. त्या पार्टीने राजकारण सोडण्याची वेळ आणली होती.साखर कारखाना अडचणीत आणला, त्यांच्या बरोबर न राहिल्याने अडचणी आल्या. तसेच मला दोन दिवसांपूर्वी फोन आला तिकिटाची काही अडचण आहे का, पण मी सांगितले मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. राजकारण सोडेन पण तुमच्या दावणीला येणार नाही.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचा पैसा आमदार रमेश कदम यांच्या नावाने कुणी खाल्ला तो तुरुंगात आहे. पण गरिबांच्या ताटातला पैसा खाणारा मुख्य सूत्रधारही लवकरच जेलची हवा खाईल. खरा तर केवळ ट्रेलर असून पिक्चर तो अभी बाकी हैे.असेही पाचपुते यावेळी म्हणाले.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘ह्या’ 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, कुठून कुठपर्यंत धावणार? पहा..
- वाहनचलकांनो लक्ष द्या! मोबाइलवर ‘हा’ मेसेज आल्यास क्लिक करू नका, अन्यथा एका झटक्यात बँक अकाऊंट होईल रिकामं
- Ahilyanagar Kotwal Jobs 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 158 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली लग्नाचा विषय निघाला की लगेचच पळ काढतात ! स्वभाव कसा असतो?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता समवेत ‘हे’ 3 भत्ते वाढणार !