जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले ‘हे’आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला द्यावी.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबाद मार्गे येऊ शकतात.

त्यामुळे २५ नोव्हेंबर, २०२० पासून परदेश प्रवास करुन अशा प्रकारे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला दयावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉ.भोसले यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment