५९ ग्रामपंचायत निवडणुकीत दोन हजाराहून अधिक अर्ज ठरले वैध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.१५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ५९ गावांच्या ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दि. २३ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर पर्यंत असल्याने एकूण २१६३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. दि.४ रोजी अर्ज माघारी व निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.

तालुक्यातील एकमेव ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर ७१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यात एकूण २१६६ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

ऑनलाइन १६२० उमेदवारांनी अर्ज भरले होते तर ऑफलाईन ५२६ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. ३१ डिसेंबर रोजी अर्जांच्या छाननीअंती २१२० नामनिर्देशन पत्र वैध झाले आहेत.

४६ नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहेत. सोमवार दि.४ रोजी अर्ज माघार दिवशी तब्बल ९५३ उमेदवारांनी अर्ज माघे घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात १०९६ उमेदवारांच्यात लढती होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment