पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आमदार लंकेचे कौतुक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते.

याला सकरात्मक प्रतिसाद देखील मिळालेला पाहायला मिळाला.पारनेर मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करताना २२२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध करण्यात आ.निलेश लंके यशस्वी झाले आहेत.

त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुक केले आहे. आज.लंके यांनी आज मुंबईत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ग्रामपंचायत निवडणुकांची माहिती दिली तसेच मतदारसंघातील प्रश्नांची चर्चा केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment