अहमदनगर मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर नामुष्की !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती.

मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना येथील उमेदवारी द्यावी लागली.

तसेच आपल्या वाट्याच्या तिसऱ्या शिर्डीच्या जागेवर स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यापेक्षा थोरातांच्या जोर्वे गावातील व कट्टर थोरात समर्थक असलेल्या सुरेश थोरातांना उमेदवारी देण्यात आली.

स्थानिक शिर्डी वा राहाता परिसरातील पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्ता ऐनवेळी विखेंना ‘मॅनेज’ होईल, या भीतीपोटी काँग्रेसने सुरक्षेचा उपाय म्हणून थोरातांच्या गावच्याच थोरातांना उतरविण्याची खेळी करावी लागली असल्याचे बोलले जात असले तरी स्थानिक स्तरावर पक्षाशी एकनिष्ठ असलेला कोणी सापडला नाही, हेही यातून स्पष्ट झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment