औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे.

शिवसेनेने औरंगाबादचे नामांतरण करुन संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. तर शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने यास विरोध केला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्‌द्‌याभोवतीच घुटमळणार असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे.

दरम्यान नाव बदलण्याच्या विषयावर आमचा विश्वास नाही, असं महसूलमंर्ती थोरात यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे शिवसेना औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यावर ठाम आहे. औरंगजेब हा तुमचा आदर्श आहे का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment