शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी मंत्री भुजबळांकडे केली ‘हि’ मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते.

मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून हि मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना घातले आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन कोपरगाव मतदारसंघात सुरू करण्यात आलेले शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे याबाबत निवेदन दिले.

चालू हंगामात समाधानकारक पर्जन्यमानामुळे सर्वच पिकांबरोबरच मका पिकाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर मका पिकाचे उत्पन्न वाढल्यामुळे दुसरीकडे मकाचे बाजारभाव पडले होते.

अशा वेळी चिंतेत सापडलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदीचा निर्णय घेतला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment