अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पारनेर तालुक्यातील नेते बचावले ! कारची झाली अशी अवस्था …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-फॉर्च्युनर वाहनास समोरून येणाऱ्या एका कारने कट मारल्यामुळे झालेल्या भिषण अपघातात पारनेर तालुक्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, शहराध्यक्ष वसिम राजे तसेच संदीप नगरे हे थोडक्यात बचावले.

कारची झाली अशी अवस्था

गुरूवारी रात्री नगर – जामखेड रस्त्यावर हा अपघात झाला.ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभुमिवर मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे हे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी तसेच कार्यकर्ते संदीप नगरे यांच्यासह राजे यांची फॉर्च्युनर कार मध्ये चिचोंडी पाटील येथे प्रचारासाठी गेले होते.

प्रचार आटोपून ते पुन्हा पारनेर कडे परतत असताना सारोळा बदगी शिवारात समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने कारला कट मारला.कारला वाचविण्यासाठी राजे यांनी रस्त्याच्या खाली त्यांचे वाहन उतरविले,

मात्र राजे यांचे वाहन थेट झाडास जाऊन धडकले. सुदैवाने या भिषण अपघातात राजे यांच्यासह तालुकाध्यक्ष माळी तसेच नगरे यांना काहीही दुखापत झाली नाही. वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment