अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- तंत्रज्ञांच्या युगात आजकही सर्वकाही सोपे सोयीस्कर झाले असून यासाठी इंटरनेट ही अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र जेव्हा हीच सेवा विस्कळीत होते तेव्हा चांगलीच फजिती होते व कामाचा खोळंबा होतो, अशीच परिस्थिती सध्या पारनेर तालुक्यातील सूप मध्ये घडत आहे.
पारनेर तालुक्यातील सुपा येथील आयडियासह बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क सतत गायब होत असल्याने बँकींग सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुधवारी सुपा व सुपा परिसरातील गावांनी आयडिया कंपनीचे नेंटवर्क चार तास बंद होते. त्यामुळे ग्रामपंचायत उमेदवारच रेंजच्या बाहेर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
सुपा व लगतच्या काही गावांनी बुधवारी सकाळी 9.30 ते 1.30 या वेळेत चार तास नेटवर्क बंद होते. सध्या सुपा परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे.
आचारसंहित्येच्या धाकामुळे जाहीर प्रचाराऐवजी सोशल मिडीयावर जोरात प्रचार चालू आहे. संपर्क करणे, निरोप देणे, मतदार यादीपासून मतदान केंद्रापर्यत सर्वच माहिती मोबाईलच्या माध्यमातून मतदारांपर्यत पोहच केली जात आहे.
एक ना एक नागरिक ऑनलाईनने जोडलेला आसतानामध्येच चार तास नेटवर्क बंद झाल्याने उमेदवाराबरोबरच कार्यकर्ते ही बेचैन झाले होते.
सुप्यात नेटवर्क नसल्याने बँकेमधील व्यवहार दिवस दिवसभर ठप्प होत आहेत. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved