अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-देशाची फाळणी झाली त्यावेळी सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळील चखलाला प्रांतातून व्हिआरडीईचे नगरमध्ये स्थलांतर करण्यात आले होते.
माझ्या नगर जिल्हयासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे.
यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन निवेदन सादर केले असून खा. पवार यांनी दिलेल्या अश्वासनाप्रमाणे लवरकच या प्रश्नी संरक्षण मंर्त्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या या संस्थेच्या देशभरात सध्या ५२ शाखा आहेत. या संस्थेने आजवर देशासाठी अनेक उपयुक्त संशोधने केलेली असून, नगरच्या संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
संरक्षण विभागासाठी आवष्यक असलेली वाहने तसेच अन्य सामग्रीही विकसित करण्यात नगरच्या व्हिआरडीईचा मोलाचा वाटा आहे. वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा विशेष ट्रॅक नगरच्या व्हिआरडीई येथे उपलब्ध आहे.
सर्वच अंगांनी नगरच्या संस्थेचे काम उजवे असल्याने ही संस्था हालविण्यामागचे कारण काय असा सवाल करून आ. लंके यांनी ही संस्था इतरत्र हालविण्यास आपला ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved