काँग्रेसच्या दणक्यानंतर नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज हटविण्यास सुरुवात ; काँग्रेसकडून स्वागत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-लालटाकी येथील पंडित नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज काँग्रेस कार्यकर्ते स्वतः १२ जानेवारीला जिजाऊ जयंती दिनी हटवतील, अशी घोषणा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी करतातच मनपा ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

(दि.८) दुपारी चार वाजेपर्यंत मध्यभागी असणारे एक मोठे होर्डिंग हटविण्यात आले आहे. आयुक्त दालना समोर काँग्रेसच्या आक्रमकपणे करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनानंतर मनपाच्या या कारवाईमुळे मनपा बॅक फूट वरती आल्याचे पाहायला मिळाले.

आता उर्वरित होर्डिंग्ज मनपा कधी काढणार याकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि शहराचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षानंतर अशाप्रकारे होर्डिंग्ज उतरविण्याची कारवाई नगर शहरामध्ये मनपाच्या वतीने पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

होर्डिंग्ज हटविण्यास सुरुवात झाल्यामुळे अनेक वर्षांनंतर नेहरू उद्यानातील झाडे पुन्हा दिसू लागली आहेत. मात्र अजूनही नेहरू पुतळा उर्वरित होर्डिंग्ज मुळे पूर्णपणे दिसत नसल्यामुळे उर्वरित होर्डिंग्ज मनपा कधी हटविणार हे पाहावे लागणार आहे.

१२ तारखेपूर्वी मनपाने उर्वरित होर्डिंग्ज उतरवले नाही तर जिजाऊ जयंतीदिनी काँग्रेसने घोषणा केल्याप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते स्वतः बुलडोजरने राहिलेले होर्डिंग्ज उतरविणार का याबाबत शहरामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe