अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-लग्न कार्य असल्याने मंडप सजला… पाहुणेमंडळी जमा झाली…नवरदेव – नवरी मंडपात पोहचले… आता लग्न लागणार तोच वऱ्हाडी म्हणून लग्नात पोलीस पथक पोहचले. शुभमंगल सावधान होण्याऐवजी वेगळीच घटना या ठिकाणी घडली.
पोलिसांनी संबंधित ठिकाणी सुरु असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला याबाबत अधिक माहिती अशी कि, चास शिवारातील हेमराज मंगल कार्यालयात ही घटना घडली. दुपारी 12 वाजता लग्न होणार होते.
चाईल्ड लाईनला बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. या विवाहाची नगर तालुका पोलिसांना त्वरित लेखी तक्रार देण्यात आली असल्याने लग्न लागणार, तेवढ्यात पोलिसांसह इतर अधिकारी टीम लग्नस्थळी पोहोचली आणि बालविवाह रोखला.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाल पोलिस पथकाने तत्पर ही कारवाई करून प्रतिष्ठित नागरिकांच्या कुटुंबातील हा बालविवाह थांबविला.
तालुका पोलिसांनी वधू अल्पवयीन असल्याने संपूर्ण कागदपत्रासह बालिकेस व वधू-वराचे आई-वडीलांना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved