खंडोबाच्या यात्रेला कोरोनाचे ग्रहण; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षांपासून कोरोनाचे संकट जगभर फोफावले आहे. यामुळे गेल्या वर्षात सर्वच सणोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. तसेच गेल्या वर्षात अनेक धार्मिक कार्यक्रमे रद्द देखील करण्यात आले.

यातच पारनेर तालुक्यामधील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोठा येथे 28 जानेवारी ते 30 जानेवारीला होणारी यात्रा कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाची परवानगी नसल्याने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान नुकतेच यात्रेबाबत देवस्थान समितीची विशेष बैठक 8 जानेवारीला देवस्थान कार्यालयात अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यात्रेला जिल्हा प्रशासनाकडून कोरोनामुळे परवानगी नसल्याने यात्रा रद्द करण्यात आली असल्याचा ठराव सर्व उपस्थित विश्वस्तांच्या संमतीने करण्यात आला.

तरी यात्रेला येणारे लहान मोठे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, भाविक, भक्त यात्रेकरुंनी यात्रेला येऊ नये. करोनाचे नियम पाळावेत तसेच देवस्थान जवळ दुकाने लावू नयेत. दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!