तरुणीच्या अपहार केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीला पाचजणांनी पळवून नेल्याची घटना राहुरी शहरात घडली आहे. याप्रकरणी राहुरी, राहाता व शिर्डी येथील सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, काही दिवसांपूर्वी मिना घनघाव हिने मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. त्या लग्नाला आम्ही नकार दिला.

याचा राग मनात धरून आरोपी मीना घनघाव, विजय गायकवाड (दोघे राहणार शिर्डी, ता.राहाता) व रवी राजेंद्र साळवे, ज्योती रवी साळवे (दोघे राहणार क्रांतिचौक, राहुरी) तसेच अनिल चांगदेव लोंढे (रा. राहाता), या पाचजणांनी मिळून

मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. दि. 4 जानेवारी 2021 रोजी तिचे अपहरण करून सुरज घनघाव याच्यासोबत पळवून लावले. याबाबत सुरज घनघाव, मीना घनघाव, विजय गायकवाड, रवी राजेंद्र साळवे, ज्योती रवी साळवे, अनिल चांगदेव लोंढे या सहाजणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा आरोपींपैकी रवींद्र साळवे व अनिल लोंढे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दि. 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इतर चार आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment