अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; बळीराजा हवालदिल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- अकोल्यातील प्रवरा, मुळा व आढळा परिसरात शुक्रवारी पहाटे सहापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील बिगर आदिवासी भागातून देखील या पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे शेतपिकांना एक भरणे झाले असले, तरीदेखील या पावसाने पिकांवर मावा, करपा व इतर बुरशीजन्य रोग वाढण्यास मदत होणार असल्याने तो शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा ठरणार आहे.

सध्या साखर कारखान्याकडून गळीत हंगामातील ऊसतोड कार्यक्रम सुरू आहे, पण या पावसाने त्यात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी सुरू असून या पावसात त्या खोळंबणार आहेत.

मागील पावसाळ्यात झालेल्या धुवांधार पावसाने शेतातील उभे ऊस जमिनीवर आडवे झाले. आजचा अवकाळी पाऊस अकोल्यात, तसेच वीरगाव, देवठाण, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, समशेरपूर,

सावरगाव पाट, नवलेवाडी, धुमाळवाडी, सुगाव, कळस, गणोरे, कुंभेफळ, कोतूळ, धामणगावपाट, धामणगाव आवारी, आंबड, मेहेंदुरी, इंदोरी, शेरणखेल, पिंपळदरी, चास, लहीत, लिंगदेव आदी अनेक गावांतून झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment