बचत गटाच्या प्रदर्शनाची परंपरा खंडित होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- कोरोनामुळे यंदाच्या वर्षी महिला बचत गटाच्या प्रदर्शनाची परंपरा खंडित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे यंदाचे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी जानेवारीमध्ये साईज्योती बचत गट महिला प्रदर्शन भरविले जाते. 2009 पासून या प्रदर्शनास सुरुवात झाली होती. महिला बचत गटांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, मसाले, सेंद्रिय उत्पादने, हस्तकला यांच्या साहित्यांचे हे प्रदर्शन भरविण्यात येत असे.

प्रत्येक वर्षी नगरकरांनी या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे नाशिक विभागातील तब्बल पाच जिल्ह्यांचे प्रदर्शन एकट्या नगरमध्ये घेण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी हे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. कोट्यवधींची उलाढाल होणारे हे प्रदर्शन यंदा रद्द करण्यात आले असल्याने शेकडो बचत गटांच्या हजारो महिलांचा रोजगार यामुळे बुडाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News