काष्टीजवळ अपघात दोघेजण ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- दौंड नगर रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, काही महिन्यांपूर्वीच काष्टी येथील व्यावसायिक पोपट माने यांनी हॉटेल शिवनेरी समोर अपघातात आपला जीव गमावला होता.

शुक्रवार दि.८ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात खरातवाडी येथील एक तेरा वर्ष्याचा मुलगा प्रवीण योगेश खरात राख़रातवाडी तसेच टाकळीकडेवळीत येथील अजय नानासाहेब वाळुंज वय २२ वर्षे हा तरुण या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काल रात्री एका दुचाकीवरून काष्टीच्या दिशेने जात असताना हॉटेल शिवनेरीजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अपघाताची माहिती समजताच पोकॉ संजय काळे आपल्या सहकारी पोलिसांसोबत घटनास्थळी गेले दौंड नगर रस्त्यावर अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News