अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात हॉटेल कृष्णाईवर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे.

या छाप्यात पोलिसांनी अवैधरित्या विक्री करण्यात येत असलेल्या 36 हजार 312 रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बटल्यांचा साठा जप्त केला आहे.

दरम्यान साहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी कि,

चास शिवारातील हॉटेल कृष्णाई येथे हॉटेल चालक संजय उर्फ सोनू मारुती कारले हा बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार साहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी (दि.8) रात्री 8.30 च्या सुमारास कृष्णाई हॉटेलवर छापा टाकला असता तेथे 36 हजार 312 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.

हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी संजय कारले विरुद्ध अवैध दारुविक्री कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe