बायपास बनतोय चोरट्यांचा अड्डा; दोन ट्रक चालकांना लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोऱ्या, लुटमारी, आदी घटना सुरूच आहे, अनेकदा अशा घटना शहराच्या बाहेरील मार्गावर घडलेल्या दिसून येत आहे. नुकतेच निंबळक ते केडगाव दरम्यान बायपास रोडवरील उड्डाणपूलावर दोन ट्रक चालकांना लुटून चोरटे पसार झाले.

ड्रायव्हरला मारहाण करत चोरट्यांनी साडेसात हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत असिमपीर बाबालाल मुल्ला (रा. मार्केटयार्ड बारामती) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, मुल्ला व रविंद्र खराडे यांचे ट्रक केडगाव बायपासवर चोरट्यांनी अडविली. ट्रक उभा राहताच एकाने काचेवर लोखंडी पाईप मारून दहशत निर्माण केली.

इतरांनी मारहाण करत मुल्ला यांचे साचेचार हजार रुपये रोख आणि खराडे यांचे तीन हजार रुपये रोख असा ऐवज लुटून पोबारा केला. चोरट्यांनी मुल्ला यांचे लायसन, आधारकार्ड आणि जॅकेटही बळजबरीने हिसकावून चोरून नेले.

घटनेची माहिती कळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मुल्ला यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment