बळीराजाचे संकटे काही केल्या संपेना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाळी वातावरण आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तसेच नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात पडणार्‍या अवकाळी पावसाने काल शनिवारीही शहर व परिसरात हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

काही काळ पाऊस तर इतरवेळी ढगाळ हवामान त्यामुळे कांदा, गहू,हरभरा, ज्वारी व अन्य पिके संकटात सापडली आहेत. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारही धास्तावले आहेत. खोकर, भोकर, माळवाडगाव व अन्य भागातही रात्री उशीरा पाऊस सुरू होता. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांना फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडले आहेत. या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली आहेत. मात्र, ढगाळ वातावरणामुळे या पिकांवरदेखील कीड पडण्याचा धोका डिसेंबर, जानेवारी महिन्यात सातत्याने निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!