दहावीच्या विद्यार्थिनीसह १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

Ahmednagarlive24
Published:

जळगाव:- दहावीच्या विद्यार्थिनीसह एका तरुणाचा पाळधी येथे खड्ड्यात मृतदेह आढळल्याने शुक्रवारी खळबळ उडाली आहे. तरुण तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला हाेता, तर विद्यार्थिनीला पळवून नेल्याबाबत गुरुवारी रात्री १२ वाजता तिच्या वडिलांनी पाळधी पोलिसांत तक्रार केली होती.

त्यामुळे दाेघांची हत्या करण्यात आल्याचा संशय तरुणाचे मित्र आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. प्रिया ऊर्फ छकुली दत्तात्रय पाटील (१५, रा.माळीवाडा, पाळधी) आणि जयेश दत्तात्रय पाटील (१९, रा.नशिराबाद) अशी मृतांची नावे आहेत. प्रिया ही पाळधी येथील सरजूबाई नंदलाल झंवर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत हाेती. पाळधी-चांदसर रस्त्यालगतच्या वीटभट्टीजवळील सुमारे सात ते आठ फूट खड्ड्यात एका रखवालदाराला हे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. प्रियाजवळ घड्याळ व शाळेची बॅग तर जयेशकडे माेबाइल आढळून आला.

घटनास्थळी पाळधी येथील नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाळधी दूरक्षेत्राचे एपीयाय हनुमंतराव गायकवाड, सहायक फाैजदार नीलिमा हिवराळे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पाेलिसांनी प्रियाच्या नातेवाइकांना घटनास्थळी बाेलावले. त्यानंतर ते मृतदेह प्रिया व जयेशचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment