भाजपच्या माजी आमदाराने काढली छेड; जमावाकडून करण्यात आली बेदम मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रेमात वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त चर्चिले जाणारे राज्य उत्तर प्रदेश राहिले आहे.

आता सत्तेत असलेल्या उत्तर प्रदेशात एका नेत्यावर मुलीच्या छेडछाडीचा आरोप करण्यात आला आहे.या आमदाराने मुलीची छेड काढल्यावर उपस्थित जमावाने त्याला माफी मागायला लावली.

त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना वाराणसीतील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

तिथे एका इंटर कॉलेजचे चेअरमन राहिलेले भाजपचे माजी आमदार माया शंकर पथक उपस्थित होते. त्यांनी एकीचे मुलीची छेड काढून तिच्याशी गैरवर्तन केले.

त्यानंतर पीडित तरुणीने आपल्या नातेवाईकांना कळले. त्यांना कळल्यावर त्यांनी या माजी आमदाराला मारहाण केली. या प्रकरणाचा अधिक तपास वाराणसी पोलीस करत आहेत.

माया शंकर पथक हे एकेकाळी वाराणसीमधून भाजपचे आमदार राहिलेले आहेत.व्हायरल होत असलेला व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच असल्याचे सांगण्यात आले.त्यांनी पीडित मुलीला ऑफिसमध्ये बोलवून गैर वर्तन केल्याचे सांगण्यात येते.

आमदार मारहाण केल्यानंतर वारंवार माफी मागताना दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment