सीना प्रदूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर मनपा हद्दीत प्रभाग सातमध्ये नगर-मनमाड महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर नागापूर वसाहतीला लागून सीना नदीचे पात्र आहे. या नदी पात्रात एका बड्या कंपनीचे दुषित, केमिकल युक्त पाणी सोडण्यात येत आहे.

या पाण्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले असून नदी पात्रातील मासे मृत पावले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या भागात चरण्यासाठी येणार्‍या जनावरांसह परिसरातील वस्तीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या नदी पात्रता गेल्या कितेक वर्षापासून गाळ साचल्याने नदी पात्र हे नागापूरच्या बाजूने अरूंद झाले आहे. त्याच एमआयडीसी भागातील एका एक बड्या कंपनीचे दुषित पाणी थेट नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे.

यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी फैलावली आहे. तसेच यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या सीना नदीपात्रातील पाणी हिरवे आणि काळसर दिसत आहे.

या पाण्यात केमिकल युक्त पाणी मिसळ्यामुळेच त्याचा रंग आणि वास बदला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यासह पाण्याला उग्र वासही आहे. नागापूर वसाहत परिसारातील म्हशी आणि गायी भागात गवत चारण्यासाठी येतात.

जनावरे चारा खावून झाल्यावर याठिकाणी नदी पात्रातील दुषित पाणी पित आहेत. यामुळे त्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रर्दुषण महामंडळाने तातडीने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांंमधून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment