अहमदनगर :- राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड मतदार संघातील रोहित राजेंद्र पवार या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे.
मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडविली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. रोहित राजेंद्र पवार हे पाटोदा तालुक्यातील पिंपळगाच्या उमेदवार आणि यांच्यासह शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत.
रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र ठरले. तर आशाबाई रामदास शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीचा पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज होता.
मुख्य उमेदवार राम शिंदे यांचा अर्ज मंजूर झाल्याने व अपक्ष उमेदवारीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार व राम शिंदे यांच्या नावाने डमी उमेदवारही रिंगणात उतरले होते. त्यातील रोहित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे.
- Big Breaking ! ग्रामसभेतून सरपंचासह विखे समर्थकांनी काढला प्रळ ! ग्रामसभेत बहुमताने…
- 400Km मायलेज, 360-डिग्री कॅमेरा आणि AI सपोर्ट – Hyundai Venue EV बद्दल हे तुम्हाला माहीत आहे का
- Volvo ES90 EV : 700 किमी रेंजसोबत BMW आणि Mercedes ला टक्कर देणारी इलेक्ट्रिक सेडान आली !
- 3 महिन्यात पहिल्यांदाचं सोन्याच्या भावात मोठा बदल ; 03 मार्च 2025 रोजीच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती किती? महाराष्ट्राची परिस्थिती कशी आहे?
- 6 Airbags सोबत येतात ह्या 5 कार्स ! जाणून घ्या तुमच्या परिवारासाठी सुरक्षित कोणती?