स्टॅंडिंग ऑडर्र आदेश राज्यातील अकराशे पोलिस ठाण्यांत आता राज्यातील पोलिसही घेणार बोठेचा शोध

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- येथील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या अटकेसंदर्भातील स्टॅंडिंग वॉरंटचा आदेश आज राज्यातील पोलीस ठाण्यांनाही पाठविण्यात आला.

त्यामुळे आता अहमदनगरसह राज्यातील पोलीसही संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे शोध घेण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यातील साधारणतः अकराशे पोलीस ठाण्यांत बोठे याच्या स्टॅंडिंग वॉरंटचा आदेश पोच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान डिसेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. तेव्हापासून बोठे पसार झाला आहे.