अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-वाहनचालकांचा बेजबाबदारपणामुळे अनेकदा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत.
नुकतेच मालवाहू कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दहा महिन्यांची चिमुकली ठार झाली असून, चार जण जखमी झाले आहेत.
दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
काटवणवाडी (डोळासणे) येथील नामदेव अंकुश पारधी व त्यांची पत्नी मंगल नामदेव पारधी हे रविवारी दुपारी आपली दहा महिन्यांची चिमुकली प्रतीक्षा हिला आजारी असल्याने दुचाकीवरुन घेऊन घारगाव येथील दवाखान्यात चालले होते.
औषधोपचार घेतल्यानंतर परतीला असताना घारगाव बसस्थानकाजवळ आले असता पाठीमागून येणार्या मालवाहू कंटेनरने दुचाकीस जोराची धडक दिली.
यामुळे आई मंगल यांच्या हातातून चिमुकली प्रतीक्षा सटकून महामार्गावर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर आई मंगल व वडील नामदेव पारधी हे जखमी झाले आहेत.
त्याच दरम्यान काही अंतरावर उभे असलेले नवनाथ सखाराम गाढवे व शिवाजी रामचंद्र भागवत या दोघांनाही कंटेनरने जोराची धडक बसल्याने नवनाथ गाढवे हे गंभीर जखमी झाले तर शिवाजी भागवत हे किरकोळ जखमी झाले.
या सर्वांना औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले. या अपघाताची समजताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी कंटेनरचा पाठलाग करत कंटेनर चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved