लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पणा अंगीकारत या चोरट्याना जेरबंद करण्यासाठी पाऊले उचलली आहे. नुकतेच पाळत ठेवून रस्ता लूट करणार्‍या पाच जणांच्या टोळीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

अटकेतील लुटेर्‍यांनी रस्ता लुटीचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अक्षय भीमा गाडे (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड), विश्वास नामदेव गायकवाड (रा.एमआयडीसी, नगर),

निलेश बाळासाहेब कार्ले (रा. गजानन कॉलनी), निलेश संजय शिंदे (रा. तांबटकर मळा, सावेडी) आणि अमोल बाबुराव कणसे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव) या पाच जणांना अटक केली आहे.

दरम्यान या आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता निंबळक-केडगाव बायपासवर दोघा ट्रकचालक आणि कार चालकाला तसेच पाईपलाईन रोडवर पादचार्‍यास कोयत्याचा धाक दाखवून

लुटल्याच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची कबुली या टोळीने दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment