कुंटूब गाढ झोपेत असतांना घराच्या चारही भिंती कोसळल्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-अनेकदा मोठं मोठे अपघात घडूनही कोणतीही जीवितहानी न झाल्याच्या चमत्कारिक घटना घडल्या आहे.

अशीच एक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे, मात्र दैवबलवत्तर म्हणून अपघात घडूनही कुटुंबालातील सर्वजण सुखरूप असल्याची चमत्कारिक घटना घडली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर येथील संताराम खेमनर यांच्या राहत्या घरामध्ये राहत असलेले त्यांचे नातेवाईक हरिभाऊ काशिनाथ हांडगर त्यांची पत्नी सौ. ताई हांडगर व त्यांची दहा ते 12 वर्ष वयाच्या 2 मुली व तीन वर्षाचा 1 मुलगा असे कुंटूब गाढ झोपेत होते.

रात्री 2 च्या सुमारास अवकाळी पावसामुळे अचानक घराच्या चारही भिंती कोसळून पत्र्याचे उभे घर कोसळले. सुदैवाने घराशेजारी असलेला विद्युत प्रवाह घर पडल्या नंतर लगेच बंद झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मात्र महिलेच्या पायावर भिंत पडल्याने त्या जखमी झाल्या आहे. या कुंटूबांचा मोठा आक्रोश ऐकल्यानंतर शेजारीच राहत असलेले रामदास लष्करे,

श्रीरंग उपळकर, नवनाथ भडांगे, बाबा कोळेकर, जालिंदर धनवटे,राजू गुंजाळ, गणेश भडांगे आदीनी या कुटुंबियाला पत्र्या खालून बाहेर काढून दवाखान्यात पोहच केले.

दरम्यान या संकटामुळे खेमनर यांच्या राहत्या घरातील टी.व्ही. संच, संसारपयोगी गॅस शेगडी, भांडी, पलंग, मांडणी आदी पूर्णतः मोडून गेले. कपडे, अन्न-धान्य भिजून खराब झाल्यामुळे मोठी वित्तहानी झाली.

घटनेमध्ये या गरीब मजुरी करणार्‍या कुंटूबांची मोठी हानी झाली असुन घटनेचा पंचनामा कामगार तलाठी ए. जे. तेलतुंबडे, मदतनीस चंद्रकांत गहिरे यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News