गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी ३० लाखांची मागणी

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यातून आरोपीला मुक्त करण्यासाठी महिलेच्या नातेवाईकाने ३० लाखांची मागणी केली. पैसे मागणारा जिवा घोडके याच्या विरोधात दादासाहेब लक्ष्मण नलगे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

महिलेच्या फिर्यादीवरुन लखन काकडे, लक्ष्मण नलगे, सुधीर नलगे, शुभांगी नलगे, राहुल नलगे, कुमार काकडे, सुनीता काकडे, स्नेहल भोसले (सर्व सांगवी दुमाला) या आठ जणांवर भादंवि कलम ३७६, ३०७, ३५४ व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल आहे.

लखन काकडे याला अटक झाली आहे. स्नेहल भोसले हिला लहान बाळ असल्यामुळे तिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला. इतर सहा आरोपी अजून फरार आहेत.

२८ सप्टेंबरला जिवा भानुदास घोडके यांनी तक्रारदार यांचे नातेवाईक अॅड. अक्षय जठार यांच्या कार्यालयात भेटून नलगेंवरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याची मागणी करत फिर्यादीची सर्व जबाबदारी मी घेतो, असे सांगितले.

अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी ३० लाख रुपये द्यावेत व प्रसिद्धी माध्यमांसमोर लक्ष्मण अण्णा नलगे यांच्या संपूर्ण कुटुंबाने पीडितेची माफी मागावी, तरच ती गुन्हा मागे घ्यायला तयार आहे.

अट मान्य केली नाही, तर जिवा घोडके व पदाधिकारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असे सांगण्यात आले. घोडके यांचे खंडणीची मागणी केल्याचे संभाषण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाले.

सरकारी पंचासमक्ष फुटेज ऐकवण्यात आले. खंडणी मागितल्याच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे दिसल्याने तक्रारदार दादा नलगे यांच्या सांगण्यावरून जिवा भानुदास घोडके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment