अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील बाभळेशवर-राजुरी शिवारात असलेल्या पायरेन्स कृषी सेवा केंद्र भागात राजुरी हद्दीत असलेल्या आतील आतोल बाजूच्या पायरेन्स रस्त्यालगत आज एका तरुणीचा मृतदेह जाळून टाकलेल्या स्थितीत आढळून आला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी हा मृतदेह पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की,
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/04/4489095a-8954-4271-a22a-37555b847700-large16x9_breakingnewsgraphic-1.png)
सकाळी परिसरातील शेतकरी आपापल्या कामावर या रस्त्याने येत-जात असताना याच ‘भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याला काहीतरी जाळलेले दिसले. त्याने जवळ जावून पाहिले असता सदर मृतदेह ‘हा एका तरुणीचा होता.
विशेष म्हणजे तो मृतदेह अर्धवट जळालेला असून तरुणीचा रंग गोर आहे. ती शरीराने उंच असून अंगावरील कपडे जळाले आहेत तर कंबरेचे काही कपडे तसेच जळालेल्या स्थितीत आहेत.
चेहरा जळाल्यामुळे ती ओळखू येण्यात अडचणी आली, अशी मृतदेहाची परिस्थिती आहे. हा मृतदेह पडलेल्या बाजूचे शेत नांगरलेले हवार केलेले असून बाजूने कच्या स्स्ता आहे.
कोणीतरी अज्ञात आरोपीने सदर महिलेला या ठिकाणी आणून तिच्या शरीरावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा खून केला असावा अशी प्राथपिक परिस्थिती घटनास्थळी दिसून येत आहे. ही घटना लोणी पोलिसांच्या हहीत येते.
लोणी पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाठैल हे घटनास्थळी पोहोचले असून पोलीस यंत्रणा पंचनामा करुन तपासाच्या कामाला लागले आहेत.
दरम्यान ही तरुणी कोण? तिचा अशाप्रकारे जाळून निर्दयीपणे खून करणारा आरोपी कोण? असे प्रश्न बघ्या नागरिकांमध्ये सुरू होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved