प्रतीक्षा संपली ! लॉन्च झाले शेणापासून बनवलेले रंग ; जाणून घ्या खासियत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-खादी इंडियाने गोबर पेंट आज लाँच केले आहे. एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी हे नवीन पेंट लॉन्च केले. हा पेंट खादी नॅचरल पेंट म्हणून सुरू करण्यात आला आहे.

खादी इंडियाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. डिस्टेम्पर आणि इमल्शनमध्ये येणारा हा पेंट इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि वॉशेबल असेल. शेणापासून बनविलेल्या पेंटची विक्री करण्यात खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) मदत करेल.

गडकरी यांनी या आधी केले होते ट्विट :- रस्ते बांधणी आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचा कारभार पाहत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या वेदिक पेंट किंवा वैदिक रंगाविषयी मागे एकदा माहिती दिली.

त्यांनी सांगितले होते की, शेणापासून बनविलेले ‘वैदिक पेंट’ लवकरच सादर केले जाईल. गडकरी यांनी ट्वीट केले की, ‘ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळावे म्हणून खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून आम्ही लवकरच शेणापासून बनविलेले’ वैदिक पेंट ‘बाजारात आणणार आहोत.

कोणी बनवला :- हा गोबर पेंट खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या जयपूर युनिट कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित पेपर इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. हे नैसर्गिक रंगद्रव्ये आणि रंग एकत्र करण्याच्या प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. सेंद्रीय वाईंडरचा उपयोग करून त्याची बांधणी प्रक्रिया मजबूत केली जाते.

पेंट फक्त 4 तासात कोरडे होईल :- भिंतीवर पेंटिंग केल्यानंतर ते फक्त चार तासांत कोरडे होईल. या पेंटमध्ये आपण आपल्या गरजेनुसार रंग देखील मिळवू शकता. खादी नैसर्गिक पेंट डिस्टेंपर पेंट आणि प्लॅस्टिक एम्युनेशन पेंट अशा दोन प्रकारात उपलब्ध असेल. सध्या त्याचे पॅकिंग 2 लिटरपासून 30 लिटरपर्यंत तयार केले गेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment